मैं वारी जाऊॅं.....
सातारा जिल्ह्यातल्या आरफळच्या हैबतबाबा आरफळकरांमुळे सातार्याचे वेगळेच भावबंध आषाढवारीशी जुळलेले आहेत . हैबतबाबानी वारीला एक शिस्तबद्ध, निययोजनबद्ध आणि वैभवी स्वरूप मिळवून दिले ॰
आळंदी ते पंढरपूर अशी संपूर्ण वारी एकाचवेळी करणे अनेक कारणांनी शक्यतेच्या टप्प्यातले नाही.म्हणून दरवर्षी एकेक टप्पा! वारीच्या एका टप्प्याचा हा आनंद-अनुभव . आषाढवारीच्या मार्गावर पाऊल टाकल्यापासून एक राजस्थानी भजन मनात घोळत, रेंगाळत होते.
"मै वारी जाऊॅं रे ”
मै वारी जाऊॅं,. ..I am overwhelmed... I am blessed. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी भाव तोच.प्रांतोप्रांतीच्या लोक परंपरांचा पदर एकमेकींशी लागलेला असतो . तिला भाषेचा अडसर नसतो . मराठमोळ्या वारीत ,राजस्थानी भजन क्षणोक्षणी साक्षात अनुभवास येत होते . सर्वजनांच्या प्रवाहात पाऊल टाकताच कुणीतरी पांडुरंगाची मुद्रा कपाळावर उमटवली.आम्ही सोळा सतरा जणी मुद्रांचे अलंकार लेऊन वारीच्या प्रवाहात किती सहज मिसळून गेलो.पुन्हा तेच राजस्थानी भजन....
ब सखी मिलकर आओ
केसर रा तिलक लगाओ
गुरुदेवने बधाओ.... मै वारी जाऊॅं रे
विठ्ठलमय,विष्णुमय , कृष्णमय वातावरण.विठठोबा-रखूमाईचा नाद भरून राहिलेला. नामदेव म्हणतात तसे जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू .. चतुर्भुज नरनारी ....चतुर्भुज परिवार ...एक माऊली सर्वत्र! देही देहभान नाही अशी वैष्णवांची मांदी---तुकोबाराय म्हणतात तशी “मुक्तिची गवादी”. वारीत भेदाभेद काही नसतो. उंच नीच नसते॰ स्वत्व निरसते..वारी म्हणजे एक मुक्त यात्रा ...एक मुक्तियात्रा. एक मंतरलेली अंतर्यात्रा .
ज्ञानदेवांच्या पालखीबरोबर ढगांच्याही पालख्या निघालेल्या! नामगजरात एक भिजणे आणि पाऊस धारात एक भिजणे! तलखी निवण्याचे क्षण! डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या बायाबापड्या,टाळ पखवाजाच्या ठेक्यावर नर्तन करणारी त्यांची पावले .घुळघुळा वाजणार्या टाळांचा झणझणा रसाळ नाद !
कुणाच्या डोईवर सबाह्य साजिरा ,सकुमार सावळा कानडा विट्ठलू !जैसा कर्दळीचा गाभा॰तुळशीमाला घातलेले ते सावळे सरुप पाहून पुन्हा मनात तोच शब्दांचा फेर ...
सावरी सुरतीया पे वारी जावा
ऐसा शृंगार तेरा किसने सजाया
देख देख भगतोंका मन हरषाया...
वारी जावा ...वारी जावा
बुद्धीवादी चिकित्सा आणि थोर आशंका बाजूला ठेवून केवळ अनुभवच घ्यावा ... मानसिक अडसर ...मेंटल ब्लॉक.. थोडा विसरूनच जावा...... आमची दिंडी नं १५७..शांत मारुति दिंडी ...सातार्याची लेवे यांची दिंडी . शेलारतात्या दिंडीप्रमुख . वीणा धरणारे रहिमतपूरचे संजय पवार . वयाच्या चौथ्या वर्षापासून वारी करणारी गौरी! वारीत न ओळख लागते न पूर्वीची देख ! शेलारतात्यांची काळजीची ,मायेची पाखर ,दिंडीतल्या सगळ्या वारकर्यांवर सतत जाणवत होती.किती थोडक्या वेळात, न आठवे घरदार,तहान भूक हरपली ,असे झाले. तुकोबांचे “वासुदेव” प्रथमच ऐकले –
बोल अबोलणे बोले
जागे बाहेर, आत निजेले
कैसे घरात घरकुल केले
नेणो अंधार, ना उजेडले गा I
मधेच ‘राधे राधे’ चा गोडवा वातावरणात भरून जायचा---गौळण साकरायची ....
‘हरीने माझे हरिले चित्त
भार वित्त विसरले
आता कैसी जाऊ घरा
नोहे लौकिक बरा ‘
मधेच भर पावसात रस्त्यातच फेर धरणे .स्वतः बद्दलचे भ्रम अहंकार किती निरसतात . स्वत; तुळशी वृंदावन वाहून नेण्याची,पताका नाचवण्याची, टाळ वाजवत- घागर मिरवत जाण्याची अनुभूति वेगळीच. दक्षिण द्वारावतीच्या दिशेने अलोट भक्तिधारा वाहत चाललेली.विठोबा म्हणजे विष्णुचे , कृष्णाचे रूप मग तिथे राधा हवीच . ही भक्तीची प्रवाही ‘धारा’ राधेचच प्रतीक. सावळ्या बिंदुल्याच्या अनावर ओढीने वाहणारी धारा ---धावणारी राधा!
वर्षानुवर्षे वारी करणारे आहेत . जसा हिमालय एकदा गेले की पुन्हा पुन्हा बुलावा धाडतच असतो तसच वारीच . तुकोबांचे ‘आंधळे पांगुळ’ऐकले . ते किती चपखल आहे –
देशवेष नव्हे माझा,
सहज फिरत आलो
करू सत्ता कवणावरी
कोठे स्थिर राहिलो न
भरेची पोट कधी, नाही निश्चळ भाव
हिंडता भागलो गा
लक्ष चौर्या ऐंशी गाव.
. पाऊसधारात,नामगजरात चिंब होणं , म्हणजे आनंदवारी -आषाढवारी! वारी संपल्यावर, घरी गेल्यावर ,” मुरडीव कानोले” करण्याची एक पद्धत आहे .करायलाच हवेत. हाताने मुरड घालून असे कानोले म्हणजे करंज्या केल्या की परत परत मुरडून, वारीला जाता येते!
Adv Seema© Adv Seemantini Noolkar

पूर्ण लेख वाचला. बालपणी आईआजीच्या तोंडून, शाळेत असताना बालवारकरी बनून, नंतर वर्तमानपत्रात रसभरीत वर्णनं ऐकून फोटो पाहून आणि टेलिव्हीजनवर तसंच सोशल मिडीयावर लाईव्ह स्वरूपात वारी अनुभवली.प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्याचं भाग्य काही अजून लाभलं नाहीए.
उत्तर द्याहटवापण आज या लेखामुळे वारीत सहभागी झाल्याची अस्सल अनुभूती मिळाली. आपसूकच मनात विठूनामाचा गजर सुरू झाला आणि प्रत्यक्ष दर्शनाची आस लागली..
हेच लिखाणाचं मोठं यश आहे. खूप आतून आलंय..भिडलं..
भक्तीरसात चिंब!
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल..श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!
खूप छान !वारीचा अनुभव नाही, परंतु भाव समजू शकतो. रवींद्र पामडी
उत्तर द्याहटवाएकदम मस्त अनुभव, एकदा तरी अनुभव घ्यायला पाहिजे
उत्तर द्याहटवाहा लेख एक तरी वारी अनुभववावी अशी ओढ लावणारा
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाखूप सुंदर अवकाशात घेऊन जातंय हे लेखन.
उत्तर द्याहटवा'बुद्धीवादी चिकित्सा आणि थोर आशंका बाजूला ठेवून केवळ अनुभवच घ्यावा ... मानसिक अडसर ...मेंटल ब्लॉक.. थोडा विसरूनच जावा...' हे अगदी चपखल वाटलं.
'सावळ्या बिंदुल्याच्या अनावर ओढीने वाहणारी धारा ---धावणारी राधा!' अगदी गहिरी डूब देतीये लिखाणाला.
फोटोतली वारीमय भावावस्था खूप मस्त!
खूप सुंदर अवकाशात घेऊन जातंय हे लेखन.

अनुभूती हीच प्रचिती असते,म्हणूनच एकतरी ओव्या अनुभवावी हेच खरे!👍👍
उत्तर द्याहटवा