गेले काही दिवस आसाम मध्ये पुराचे थैमान सुरू आहे .ब्रम्हपुत्र धोक्याच्या पातळी वरुन वहायला लागली आहे आणि ते पाहून पुन्हा एकदा तेच गाणं मनात घोळायला लागलं.
मी पहिल्यांदा आसामी भाषेतलं गीत ऐकलं होतं .डोळ्यासमोर अक्षरशः चित्र उभं करतं ते गीत. आजही गाणं मनातून जात नाही पण ते चित्र समोर येणं नको वाटतय.
"बिशतिर्न पारोरे
अहंक जानोरे
हाहाकार शिनेयू .
निखब्द निरोबे
बुढा लोई, बूआ कियो?
( ब्रम्हपुत्रा , तुझ्या अपार विस्तिर्ण काठांवर असंख्य लोक आहेत. तू हाहाकार मांडला आहेस आणि तरीहि नि:शब्द वहात आहेस. ओ गंगा, गंगा तुम,बहती हो क्यूं?)
हे गीत असामी, बंगाली आणि हिन्दी मध्ये आहे . भूपेनदा जिला गंगा म्हणून हाकारतात ती म्हणजे आख्खा आसाम जिच्या जिवावर आहे ती ब्रम्हपुत्रा....म्हणजेच “बुढा लोई” . ब्रम्हपुत्रेला “सिरी लोई”, ‘बार लोई” असं ही म्हणतात . मुळात ब्रम्हपुत्रा नदी नव्हेच. तिचे पात्र इतके विस्तीर्ण, सागरासारखे आहे की तिला 'नद' म्हणतात. आसामच्या प्रत्येक कुटुंबात एखाद्या बुजुर्ग माणसाला मान असावा तसा ब्रम्हपुत्रेला आहे . म्हणून तो "बुढा लोई."
आज प्रत्येक आसामी माणूस बुढा लोईला विचारतोय,
“बुढा लोई,
बुढा लोई तुमी, बूआ कियो? “
बुढा लोई, तू असा अनावर होऊन का वाहतो आहेस?लाल लाल पाण्याने का उफाणतो आहेस?
बुढा लोई, रागावलाय. बुढा लोईच्या लेकरांना ते समजतय. ते नाराज होत नाहीत. आपल्या जन्मदात्याचं रागव़णं समजून घ्यायला हवं असं त्याची निष्पाप, लेकरं मानतात.
ब्रम्हपुत्रेच्या प्रार्थनेतही ती लेकरं म्हणतात ,
“ब्रम्हपुत्र, नमोमी,
कभी शांत ,कभी रुद्र.....”
पण हल्ली हल्ली, बुढा लोईचं रागवणं जरा जास्तच आहे .रागाने लालेलाल होऊन उसळतोय. बुढा लोईला आपल्या अंगाखांद्यावर बागडणार्या लेकरांचीही फिकीर नाही़सं झालय. दोन्ही तीरांवर हाहाकार मांडलाय नुसता. वृक्षच नव्हे तर माणसंही उन्मळून पडली आहेत. काझिरंगात र्हायनो, हत्तींची कलेवरं पुराच्या पाण्यात तरंगत आहेत. रागावलाय बुढा लोई? माणसाने निसर्गाचा मांडलेला विध्वंस पाहून?त्याचा रुद्रावतार पाहून आता लेकरांचाही धीर सुटलाय.
पोरं जशी शेवटी आईवरच चिडतात, रागावतात आणि तिलाच खळीला येऊन का रागवतेस सारखी, म्हणुन जाब विचारतात ,तसंच बुढा लोई ची लेकरं त्याला विचारात आहेत,
"बिस्तार है अपार, प्रजा दोनोपार,
करे हाहाकार ,
ओ गंगा, गंगा तुम, बहती हो क्युं?
निशब्द सदा , ओ गंगा तुम बहती हो क्यू?
निसर्गाचा नाश, माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी केलाय. माणसाची नैतिकताच नष्ट झालीय... मानवता संपून गेलीय....
"नैतिकता नष्ट हुई , मानवता भ्रष्ट हुई,,
इतिहासकी पुकार, करे हुंकार
निर्लज्ज भावसे बहती हो क्यू?
ओ गंगा की धार,
निर्बल जनको ,सबल संग्रामी, समयोग्रामि
बनाती नही क्यू?
बुढा लोई, तुझी लेकरं हतबल निर्बल झाली आहेत. तूच त्यांना सावरायला , धीर खंबीर बनवायला हवय .....तुला काहीच वाटत नाही का?
तुझ्या अनपढ-अक्षरविहीन लेकरांना खायला अन्न नाही,झोप नाही. तरी तू मौन का?
बुढा लोई तूच कर आता काही तरी ...
"व्यक्ति रहे व्यक्ति केन्द्रित,
सकल समाज व्यक्तित्व रहित
निष्प्राण समाजको, तोडती ना क्यू?"
ब्रम्हपुत्रेचं दरवर्षी पात्र बदलणं, दरवर्षी अफाट पूर येणं , तसं अंगवळणी पडलेलं आहे. ब्रम्हपुत्रेच्या पुराचे उल्लेख ई. स।1241 इतक्या मागे पर्यन्त सापडतात. पण 1897 आणि 1950 च्या भूकंपात ब्रम्हपुत्रेचा परिसर हलला. बिथरला.त्यात ग्लोबल वॉर्मिंग, मातीची धूप, अनिर्बंध वाळू उपसा, वृक्षतोड यांची भर .प्रलयंकारी पुराचे थैमान सुरू झाले. 1988 चा महापूर, त्यानंतर 2017 चा. दरवर्षी नवनवीन रेकोर्ड्स! यावर्षी तर आताच 40 लाखांच्या वर विस्थापित झालेत. शंभरच्यावर मृत्यूमुखी पडलेत.हाहाकार म्हणजे काय त्याचा हा साक्षात अनुभव!
भूपेनदांची गीतं म्हणजे paintings असतात.समोर चित्र उभं रहातं. ती लोक संस्कृतीची ,लोकजीवनाची गीतं असतात.
भूपेनदांच्या "ओ गंगा तुम " या गीताची प्रेरणा पॉल रॉबसन या आफ्रिकन-अमेरिकन सिंगरचे एक गाणे आहे....
O ! MAN RIVER,
YOU JUST SAY NOTHING,
JUST KEEP ROLLING ALONG...
अर्थात त्या गाण्याचे हे भाषांतर नाही . साम्य फक्त एकच आहे. पाॅल राॅबसनचाही "MAN "RIVER आहे आणि भूपेनदांचाही ब्रम्हपुत्र "नद". . बुढा लोई.
भूपेनदांचे गीत बुढा लोईचेच गीत आहे . त्या गीताला आसामच्या बुढा लोईचाच रंग- गंध आहे.इतकेच नाही तर बिहारच्या कोसी , गंडक चाही रंग -गंध आहे, गंगा-यमुनेचा आहे.गोदावरी- कृष्णेचाही आहे.
ब्रम्हपुत्रेचं पात्र एरवीही , पावसाळा नसतानाही, डोळे फाटतील इतकं अफाट, अथांग, विस्तीर्ण असतं .एकदा भूपेनदा त्याबद्दल म्हणत होते.. . “नोदिर कुल नाई ...”.कुल म्हणजे तीर . नदीला तीरच नाहीत असं वाटावं इतके ब्रम्हपुत्रेचे दोन तीर दूर आहेत .बांग्लादेशचे कवि अब्बासुद्दीन तिथे होते . ते म्हणाले, “नोदिर कुल नाई” असं नाही म्हणायचं .
असं म्हण...
“नोदिर कुल ना ssssssssss ई
नोदिर कुल ना ssssssssssssssss ई”
या तानेतून - हरकतीतून ब्रम्हपुत्रेचे दोन तीर किती दूर आहेत ते क्षणात उमगतं.
ब्रम्हपुत्रेत चालणारी मासेमारी तिच्या काठावरच्या लोकांच्या जगण्याचा अपरीहार्य भाग आहे.अशाच एका रमय्या नावाच्या मांझीचे – कोळ्याचे गीत जीव गलबलुन टाकते.
उस दिन की बात है
रमय्या नाव लेके सागर गया .
त्या दिवशी ‘धुमूआ’ची – वादळाची चाहूल लागलेली पाहून रमय्याची रमणी त्याला म्हणते,
जाल बिछानेको, जैय्यो न रे, जैय्यो न रे रमय्या,
तूफान आएगा
आज तडकेसे , दाई आंख फडके रे
रुक जा ना, रुक जा रे ...
आज कुछ हो जाएगा ..
उस दिन की बात है
रमय्या नाव लेके सागर गया ।
धुंध्लोंकी लालीमे , सागरके पानी मे , सागर की लहरोंमे
रमय्या .....गुम हो गया ...
देती है दुहाई रे, छाती पिटे हाय हाय
रमणी बावली हो गई....
लहर जा मुई, रात पार जा मुई ,लहर जा मुई..
रमय्या का समय हो गया..... रमय्या का समय हो गया...
लहरिया ले तो आई ,
रमय्या की लाश लाई
लोरी सुनाके गई,
किनारे सुलाके गई......
उस दिन की बात है ....
नुकतच ‘अम्फान’चा तडाखा बंगाल, ओदिशाला बसला , ‘निसर्ग’चा कोकण किनारपट्टीला बसला ..अशावेळी रमय्या आसामचा राहत नाही. तो बंगालचा असतो, ओदिशाचा असतो. कोकणचाही असतो.
यातला रमणीचा परिस्थितीचा acceptance मात्र जीवाला चटका लावून जातो. आसाममधल्या लोकांचं दुःख , असुरक्षित जगणं सांगून जातो.
संपूर्ण पूर्वोत्तर राज्य कायम दुर्लक्षित राहिली.ना रस्ते ,ना पूल , ना जीवनावश्यक सोई सुविधा ! अगदी अलीकडे कित्येक वर्षे प्रतीक्षा असलेला आसाम - अरुणाचल यांना जोडणारा ब्रीज झाला. या बीम ब्रिजचे नाव “भूपेन हजारीका सेतू” . संपूर्ण पूर्वोत्तर राज्यं म्हणजे आसाम होता एके काळी. हा आसाम भूपेनदांचा श्वास होता.ते म्हणत, “आसाम महाभारतका महाअंग महारूप है "प्राचीन कामरूप, प्राचीन प्रागज्योतिषपूर! या आसामबद्दल त्यांची स्वप्नं होती. इथल्या भूमिपुत्रांच्या जगण्यात बदल व्हावा यासाठी तळमळ होती.
बिहार , आंध्र, आसाम – सगळीकडे पुराने थैमान घातले आहे आणि अशावेळी गाणी कसली सुचतात असं कोणाला वाटू शकतं. पण भूपेनदांची गीतं समाजात बदल घडवण्यासाठीच आहेत. ते म्हणत हाथमे ‘गन’ लेके कुछ नही होगा. इसलीये हमने 'गन 'नहीं “गान’ चुना है l
आता भूपेनदा नाहीत.आणि बुढा लोई तर जास्तच रागावायला लागलाय .तो रागावू नये म्हणून काहीतरी करायला हवय. ते “काही तरी’ अर्नब जन देका या आसामी कवीला कळलं आहे. भूपेनदांच्या जातकुळीतलाच आहे तो. Tess Joyce बरोबर त्याचं एक कवितांचं पुस्तक आहे “A STANZA OF SUNLIGHT ON THE BANKS OF BRAMHAPUTRA” त्यात एक हायकू आहे. प्रातिनिधिक.
"TOUCH THE BLACK SOFT SAND
OF THE FLUID GOLDEN LAGOON
........
DON'T THROW RUBBISH BAGS...... "
हे मनावर घेतलं तर कुठलाच बुढा लोई कधीच रागवायचा नाही.
(दोन्ही गाणी . . भूपेनदांच्या आवाजातली youtube वर आहेत. एकदा ऐकुन समाधान होणार नाही अशीच आहेत)
(Photo credit: PTI and Rutu raj Kanwar)
©Adv Seemantini Noolkar
अप्रतिम
उत्तर द्याहटवाआयुष्यात एकदा तरी ब्राह्मपुत्रा बघायला च हवी .डोळयाचे पारण फिटते . अन् तीचे रौद्र रूप लेकराना रडवते हेही खरेच .
उत्तर द्याहटवाभूपेनदांचे समारक ही खुप छान आहे . लेखणी व माईक दोन्ही ची सुंदर रचना केली आहे . विलक्षण कवी व संगीतकार . 🙏 छान लेख
SHRI Adnyaat
हटवाDhanywaad
Aapan ataa dusryaa rasikan & dusryaa raajyaan kadun barech shikawe laagnaar aahe
खुप छान लिहिले आहे. मी ही तीन वर्षे गौहातीला होतो. अनेक आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या. धन्यवाद
उत्तर द्याहटवाLAAHE LAAHE
हटवाबुढा लोईचे पर्यायाने निसर्गाचे रागावणे ही आपल्याच कर्माची फळे आहेत.. पण हे कधी कळणार आपल्याला..
उत्तर द्याहटवाछान लिहिले आहेस..नेहमीप्रमाणे.
Velach nahi
हटवाएक विषय पण अनेक संदर्भ देऊन विषय मांडण्यातील किमया खूपच छान. बुढा लोईचा रंग, गंध छान वटला आहे.
उत्तर द्याहटवामनापासून शुभेच्छा!!!
सुंदर वर्णन, सामाजिक संदेश
उत्तर द्याहटवामस्तच लिहिलेस.पुराचा थरार मनात साक्षात उभा राहिला.मला काझी नझरुल इस्लामची भातियाली आठवली.
उत्तर द्याहटवाएकुल भांगे एकुल गोरे
ए तो नादिर खेला
सकाल बेलार आमिर रे भाय
फोकिर संध्या बेला
एका तीराला पोखरत नदी दुस-या तीराला समृद्ध करते...पण इथे तर दोन्ही तीर उध्वस्त!
PUNARNIRMITI SATHI.
हटवाthank you dear all
उत्तर द्याहटवाकाळीज पिळवटून टाकणारं लिखाण!
उत्तर द्याहटवाभूपेनदांच्या गाण्यात जशी प्रत्ययात्मकता आहे, तशीच या लिखाणातही प्रत्ययात्मकता आहे .
'बूढा लोई' तर अगदी आपल्या आसपासचा, आपलाच कुणीतरी बुजुर्ग वाटतो... जणू आपल्या बांधावर बसणारे आजोबा, आपला यवतेश्वराचा पुरातन डोंगर... जो आपल्याकडे, आपल्या प्रत्येक कृतीकडे पाहात आहे ...
रमय्या नावाच्या मांझीचे – कोळ्याचे गीत खरंच जीव गलबलुन टाकते..
या सगळ्या प्रवाही लिखाणात वाचताना आश्वासकतेकडे घेऊन जात आहेस हे खूप भावलं...
'हाथमे ‘गन’ लेके कुछ नही होगा. इसलीये हमने 'गन 'नहीं “गान’ चुना है। ' -अगदी सही!
'TOUCH THE BLACK SOFT SAND
OF THE FLUID GOLDEN LAGOON
........
DON'T THROW RUBBISH BAGS...... " हे तर जणू प्रत्येक संवेदनशील ह्रदयाचं ह्रद्गत!
असं वाटतंय, या बहुविध लिखाणातून हळूहळू सगळा भारत व्हर्चुअली पाहून होईल...
खूप खूप शुभेच्छा! 💐💐💐
British gave due respect & got the best from him.
उत्तर द्याहटवाWe did not.
But one thing for sure;asamiya loves him more than self.
He is GODSPEED OF NORTH EAST INDIA.
I AM LUCKY TO BE WITH HIM.
Pl.
Accept my compliments.
AT --( :- DBRT
उत्तर द्याहटवा3 D live & tasty too,Now my next destination after C-19